देविदास पांचाळ सर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना चित्रकला साहित्य वाटप

श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेले श्रीमान देविदास पांचाळ सर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी चित्रकला ग्रेड परीक्षा एलिमेंटरी परीक्षा व इंटरमिजिएट परीक्षा या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना चित्रकलेचे साहित्य वाटप करण्यात आले त्यामध्ये ड्रॉइंग वही, पेन्सिल, रबर, पट्टी,कलर खडू बॉक्स, वॉटर कलर बॉक्स, ब्रश सेट, डिश इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. हा उपक्रम गेले सात ते आठ वर्षापासून वाढदिवसानिमित्त राबवण्यात येतो.

विद्यालयाचे प्राचार्य श्रीमान वैजनाथ घोडके सर यांनी श्रीमान पांचाळ सरांचा पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.