श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचा एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के !

श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचा एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के !

तुळजापूर

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा सन 2024 चा निकाल शंभर टक्के लागला आहे. दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत विद्यालयाने उत्तुंग भरारी घेतलेली आहे.

एसएससी परीक्षेत एकूण 64 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी पंधरा विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये आलेले आहेत, सात विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये आलेले आहेत, व एक विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला आहे. विशेष प्राविण्यासह 41 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीमध्ये एकूण 15 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीमध्ये सात विद्यार्थी, तर तृतीय श्रेणीमध्ये एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला .

त्यामध्ये विद्यालया मधून कु. शिवगुंडे प्रणव परमेश्वर 95.40% गुण घेऊन प्रथम, कु. मोरे जयराज अनिल 93% गुण घेऊन द्वितीय, तर कु. पुजारी ओम हनुमंत याने 92.60% गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे माननीय डॉ. सचिन ओंबासे जिल्हाधिकारी धाराशिव तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर. मा. श्री संजय ढवळे उपविभागीय अधिकारी, मा. श्री अरविंद बोळंगे तहसीलदार, मा. श्री सोमनाथ वाडकर तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन व विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य श्री वैजनाथ घोडके सर यांनी अभिनंदन करून त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या