श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी
—————————————
तुळजापूर

येथील श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज. यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अज्ञान व अंधश्रद्धेच्या खाईतून समाजाला प्रकाशात आणण्याचे कार्य, ज्या राजाने केले जातीव्यवस्थेला विरोध करून सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी अविरत प्रयत्न केले, दीन, दलित, गोरगरिबांसाठी शाळा, महाविद्यालय तसेच वस्तीगृहाची सुरुवात ज्यांनी केली, क्रीडा, प्रकारातील कुस्ती या खेळावर प्रेम करणारे एकमेव राजा, म्हणजे छत्रपती शाहू महाराज होत. शेतकऱ्यांसाठी अतुलनीय असे कार्य करणारे, शेतकऱ्यांच्या शेतीसाठी व सर्वांसाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून कोल्हापूर येथे भोगावती नदीवर बांधलेले राधा नगरी धरण आजही प्रसिद्ध आहे. त्यांचे आठवण करून देते. माझ्या राज्यातील प्रजा शिक्षणाने जरी शहाणी झाली तर मी माझे सारे राज्य त्यांच्या स्वाधीन करीन असा संदेश देणारे असे मोठ्या मनाचे राजे.

आज त्यांच्या जयंतीदिनी विद्यालयाचे प्राचार्य श्रीमान वैजनाथ घोडके सर डॉ. पेटकर सर यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थी , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.