श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात नूतन कमांडंट रुजू

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक  विद्यालयात नूतन कमांडंट कर्नल मकरंद देशमुख सर रुजू झाले आहेत विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य श्रीमान वैजनाथ घोडके सर यांच्या हस्ते त्यांचा बुके देऊन स्वागत सत्कार करण्यात आला तसेच इयत्ता आठवी मधील विद्यार्थ्यांनी सुंदर व मधुर आवाजात स्वागत गीत गायले स्वागत गीतातून त्यांचा सत्कार करण्यात आला स्वागत गीतासाठी श्रीमान प्रदीप सुतार सर यांनी तबलावादन केले तर स्वाती वेल्हाळकर मॅडम यांनी हार्मोनियम वर साथ दिली.

स्वागत कार्यक्रमानंतर विद्यालयाचे प्राचार्य श्रीमान घोडके सर यांनी प्रास्ताविक पर शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंतची संपूर्ण माहिती दिली आजही इमारत उभी आहे परंतु याच्या पाठीमागे सर्वांचे कष्ट आहेत गेल्या 25 वर्षापासून सर्वांनी अत्यंत तळमळीने या शाळेसाठी परिश्रम घेतलेले आहेत शिक्षक शिक्षकेतर सर्व कर्मचारी शाळेतील प्रत्येक घटकांनी परिश्रम घेतल्यामुळे ही इमारत फळा आली आहे असे मनोगत व्यक्त केले त्यानंतर मा  कमांडंट देशमुख सरांनी आज पर्यंतच्या केलेल्या कार्याबद्दल कौतुक करून सर्वांचे अभिनंदन केले व पुढील येणाऱ्या काळात सर्व मिळून एकत्र मिळून सहकार्य वृत्तीने कार्य करूया व आपल्या शाळेचे उद्दिष्ट पूर्ण करूया अशी ग्वाही दिली व सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सूत्रावे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ विजय वडवराव यांनी केले.