सैनिकी विद्यालयात नूतन कमांडंट ग्रुप कॅप्टन प्रणव पांडा सरांचे आगमन व स्वागत!!

श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक 15/ 3/ 2023 रोजी नूतन कमांडंट श्रीमान प्रणव जी पांडा यांचे आगमन झाले विद्यालयाच्या वतीने टाळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्रीमान घोडके सर यांच्या हस्ते शाल व बुके देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यालयातील रायफल ग्रुप ने मानवंदना देण्यात आली याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी श्रीमान प्रणव सरांनी आनंद व्यक्त करत सर्व कर्मचाऱ्यांची ओळख करून घेतली. विद्यालयाच्या प्रगतीसाठी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी, विद्यार्थी एनडीए परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी, तसेच दहावी नंतर विद्यार्थ्यांची गळती कमी होण्यासाठी आपण सर्वांनी मिळून सहकार्याने काम करूया असे प्रोत्साहन पर व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.