Facebook
WhatsApp
Email

मित्रांनो आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन! आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला परंतु तरीही आपला मराठवाडा अजून स्वतंत्र झाला नव्हता! जुलमी, जाचक, अशा निजामाच्या गुलामगिरीत होता. हा मराठवाडा मुक्त करण्यासाठी शेकडो क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले आहे! हजारो शूर, वीर, धाडसी युवकांनी सक्रिय सहभाग घेतला होता व या सर्वांचे श्रेय म्हणून आपला मराठवाडा 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र झाला. तोच आजचा दिवस यालाच आपण मराठवाडा मुक्ती संग्राम असे म्हणतो लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाई श्राफ, बाबासाहेब परांजपे, गोविंदराव पानसरे, अशा कितीतरी नेत्यांनी प्राण पणाला लावून मराठवाडा मुक्त केला. अशा सर्व शूर वीरांना विनम्र अभिवादन! 🙏🏻🙏🏻💐💐

मराठवाड़ा मुक्ति संग्राम !!

मराठवाड़ा मुक्ति संग्राम !! भारत स्वतंत्र झालातरी नव्हतो आपणस्वतंत्र झालो,जुलमी निजामी सत्ता होती आपल्या सत्तेवरराज्य करत! सर्वत्र होता काळोखमाजले होते स्तोमअन्याय, अत्याचारबलात्काराचे!घरे, दारे, जळालीपडला संसार उघड्यावर !जाचक, जुलमी आटीने त्रासली होती भोळी जनता हृदय पिळवटुन टाकणारीहोती क्रूर निजामी सत्ता !!अशाच काळोख्या वेळीउगवले तारे स्वातंत्र्याचेस्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाई श्राफ,बाबासाहेब परांजपे,गोविंदराव पानसरेअसे कितीतरी स्वातंत्र्यजाणि उठले पेटुन आपल्या माय मराठीमराठवाडयासाठी! हजारोंच्या संखेने प्राणाचीबाजी लावली, हुतात्मे झाले आणि लोहपुरुषसरदार वल्लभभाई पटेलांच्या दिव्य कार्याने दोनशे चोवीस वर्षांची गुलामगिरी मोडित काढली अन १७ सप्टेंबरमराठवाडा मुक्ति संग्रामाची सुवर्ण पहाट उगवली !!कोटि कोटि विनम्र अभिवादन त्या हुतात्म्यांच्या चरणी ||कविदेविदास पांचाळ सर, सैनिक स्कूल, तुळजापुर,जिल्हा उस्मानाबाद ।

देविदास पांचाळ सर,