20 मार्च जागतिक चिमणी दिन

श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक 20 मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त पक्षांना पिण्यासाठी पाणी ठेवण्यात आले.

प्रति वर्षाप्रमाणे विद्यालयातील हिंदी शिक्षक श्रीमान देविदास पांचाळ सर यांनी पक्षांना पाणी पिण्यासाठी छोटे छोटे प्लास्टिक टब शाळेला भेट दिले .

विद्यालयाचे प्राचार्य श्रीमान वैजनाथ घोडके सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत वनराईने नटलेल्या शाळेच्या सुंदर परिसरात चिमण्यांसाठी व सर्व पक्षांना पिण्यासाठी पाण्याचे छोटे टब झाडांना बांधण्यात आले