मा. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केले सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण !

तुळजापूर – येथील श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी सदिच्छा भेट दिली. विद्यालयातील सर्व कामकाजाबाबत प्राचार्याशि सुसंवाद साधला व समाधान व्यक्त केले. विद्यालयातील बॉटनिकल गार्डन ( वनस्पती उद्यान) उद्यानास भेट देऊन विविध प्रकारच्या वनस्पतींची माहिती घेतली . विद्यार्थ्यांसाठी या बॉटनिकल गार्डन चा निश्चितच उपयोग होईल अशी आशा व्यक्त केली. मा जिल्हाधिकारी यांनी यावेळी आंब्याच्या झाडांचे वृक्षारोपण केले.

याप्रसंगी मा अरविंद बोळंगे तहसीलदार तुळजापूर, मा. सोमनाथ वाडकर श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासक, मा अमृतराव श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान स्थापत्य अभियंता, विद्यालयाचे प्राचार्य श्रीमान वैजनाथ घोडके सर, पर्यवेक्षक डॉ पेटकर सर बॉटनिकल गार्डन च्या प्रमुख श्रीमती माने मॅडम, हरित सेना प्रमुख श्री आनंद कुलकर्णी सर, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते