श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयांमध्ये विजयादशमी महोत्सव उत्साहात साजरा.

श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयांमध्ये विजयादशमी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला विद्यालयाचे नूतन कमांडंट सन्माननीय मकरंद देशमुख सर यांच्या हस्ते महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे प्रथम पूजन करण्यात आले यावेळी विद्यालयातील हरिभाऊ कुलकर्णी यांनी मंत्रोच्चार पद्धतीने पूजा केली .

विद्यालयातील सर्व विभागातील साहित्य शस्त्र अस्त्र क्रीडा कला सांस्कृतिक साहित्याचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी नूतन कमांडंट श्रीमान देशमुख सरांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त एकता शाळेविषयी प्रेम अभ्यास परिश्रम करण्याची वृत्ती श्रमदान करण्याचे वृत्ती तसेच आपले ध्येय ठरवले पाहिजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एनडीएची तयारी केली पाहिजे एनडीए चा अभ्यास सहावीपासूनच आपल्याला करावयाचा आहे खूप मेहनत घ्यावयाची आहे. विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य श्रीमान घोडके सर पर्यवेक्षक डॉ पेटकर सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने आपण हे यश नक्कीच मिळवू असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

विद्यालयातील कुंभार आणि भद्रे या विद्यार्थ्यांचा वाढदिवस सन्माननीय सरांच्या हस्ते साजरा करण्यात आला इयत्ता सहावीतील पालकांनी सर्व विद्यार्थ्यांना पेनचे वाटप केले याप्रसंगी श्रीमान पांचाळ सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..