Shri Tuljabhavani Temple Trusts,
Shri Tuljabhavani Sainiki Sec. & Higher Sec. School,Tuljapur
श्री तुळजाभवानी सैनिक स्कूलचा HSC परीक्षेचा 100% निकाल.

 श्री तुळजाभवानी सैनिक स्कूलचा HSC परीक्षेचा 100% निकाल.

तुळजापूर प्रतिनिधी

श्रीक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 2024- 25

चा बारावी परीक्षेचा निकाल प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी शंभर टक्के लागला आहे .

शैक्षणिक वर्ष 2024 -25 मधील एचएससी परीक्षेत एकूण 30 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते.
सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गुणानुक्रमे विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत.

1-गिरी प्रद्युम्न कमलाकर -83.83%
2-रुपनर हर्षद सुरेश-77.33%
3- सुरवसे मंथन धनंजय-76.33%

30 विद्यार्थ्यापैकी
विशेष प्राविण्य-04
प्रथम श्रेणी-15
द्वितीय श्रेणी-11 बारावी परीक्षेत सर्व उत्तीर्ण व यशस्वी विद्यार्थ्यांचे मा जिल्हाधिकारी धाराशिव कीर्ती किरण पुजार,

मा. आमदार राणा जगजीत सिंह पाटील ,तुळजापूर तहसीलदार मा. अरविंद बोळंगे सैनिक स्कूलचे कमांडंट कर्नल मकरंद देशमुख

व विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य श्रीमान वैजनाथ घोडके सर इत्यादींनी
सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे व पालकांचे हार्दिक अभिनंदन केले तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले .