आदरणीय प्राचार्य वैजनाथजी घोडके सर,
20 ऑक्टोबर 1999 पासून आपण एकत्र शिक्षक म्हणून एकदिलाने कामाची सुरुवात केली आणि पुढे आपण श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि आजही अत्यंत जबाबदारीने ती सांभाळत आहात, हे आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.
आपल्या नेतृत्वाखाली विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण घेत असलेले प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी आहेत.
शाळेतील शिक्षक, शाळा व वसतिगृह विभागात काम करणारे वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक,मेस विभागातील कर्मचारी, शाळा सुरक्षा विभागातील सुरक्षा कर्मचारी, आणि सफाई कर्मचारी या सर्वांना एकत्र करून संघभावनेने कार्य करण्याची सुंदर परंपरा आपण निर्माण केली आहे.
प्राचार्य म्हणून अत्यंत जबाबदारीने काम करत असताना निर्माण होणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीला समर्थपणे तोंड देऊन मार्गक्रमण करण्याचे आपलं कसब अत्यंत उल्लेखनीय, आमच्यासाठी मार्गदर्शक आहे.
आपल्या या नेतृत्वगुणांना, शिस्तप्रिय स्वभावाला आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या अपार प्रेमाला सलाम!
आपला पुढील प्रवास आरोग्यदायी, यशस्वी आणि आनंदमय होवो हीच शुभेच्छा.
