तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक सादरीकरण

तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैजनाथ घोडके यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. पर्यवेक्षक डॉ. सुभाष पेटकर, वर्गशिक्षक सुनील वाडीकर, विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद जाधवर, निरंजन गंभीरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी श्रीमती स्वाती वेल्हाळ व संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी सुंदर गीत सादर केले. यावेळी प्रदीप सुतार यांनी तबल्यावर साथ दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *