फुटबाल स्पर्धेत सैनिक स्कूलला उपविजेतेपद तुळजापूर

फुटबाल स्पर्धेत सैनिक स्कूलला उपविजेतेपद तुळजापूर :

धाराशिव येथे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या १५ वर्ष वयोगटातील मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावले आहे. विजेत्या संघास मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरन करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा विभाग प्रमुख राजेश बिलकुले व क्रीडा मार्गदर्शक श्री रेणके यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैजनाथ घोडके, पर्यवेक्षक डॉ. सुभाष पेटकर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *